June 17, 2016

प्रकाश-शलाखा- भंडारदर्‍याचा काजवा मोहोत्सव

वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवरदगड धोंड्यांवरपाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्‍यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्तेक घटकाला माहीत असतंरात्री नंतर दिवस उजाडणारच आहेफक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणारत्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साहआनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो.
निसर्गातला जिवंतपणापक्षांच्या किलबिलाटासहित त्याच्या स्वछंदी बागडण्यातून सर्वत्र मोकळा आनंदीऊत्स्फूर्त जिवंतपणा भरून टाकणार असतो. निसर्गाला या येणार्‍या सृष्टीतल्या बदलाची जाणीव होते. त्यातील प्रत्तेक घटक येणार्‍या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपआपल्या परीने त्याच्या स्वागताची तयारी करत असतो. 
असाच एक चमत्कार सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्येरानावनात घडत असतो. ज्यावेळी आपण निद्राधीन असतो त्याचवेळी नभोमंडल जमीनीवर पांनाफुलांमध्ये अवतरलेलं असतं. वैशाख महिन्याच्या शेवटाला रात्रीच्या अंधारात काजव्यांचा थरार सुरू होतो. जंगलात दमटजागीपाण्याच्या जवळपास हजारोलाखो किंवा कोट्यवधी काजवे जमा होतात.

लहानपणी शेतामध्ये काजव्यांचा मागून धावताना कित्तेक तास घालवलेत. तेव्हा एकटेदुकटे दिसणारे काजवे अखाद्या चहाच्या कपात पकडून गोळाकरायचेकपावर उपरण्याचा एकपदरी पडदा बांधला की झाली तयार आमची वीजेरी. किती वेळा आणि किती वर्ष हा खेळलो असेल आता आठवत नाही. लहान पणी जेव्हडे काजवे दिसायचे तेव्हडेही काजवे आता गावी दिसत नाहीतयाची खंत असायची मनात. सहा वर्षापूर्वी रात्री दुचाकीवरून गावी जाताना अचानक माला शोध लागला  भंडारदर्‍याच्या काजवा मोहोत्सवाचा. तेव्हापासून प्रत्तेक वर्षी हा काजवा मोहोत्सव पहाण्यासाठी भंडारदर्‍याला जाणे होते.  
वैशाखसरताना भंडारदर्‍याच्या हवेतच बदल होत नाही तर निसर्गही कात टाकतो. चोहोबाजूंना मिट्टकाळोख पसरलेला असतो आणि काजव्यांच्या प्रकाश शलाखा रस्त्यावरूनझाडांवरून खाली दारीतून डोंगरावरून लुकलुकत असतात. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागात अजूनही निसर्ग त्याच्या मूळ रूपात शाबूत आहे. ग्रीष्माच्या शेवटी आणि पावसाच्या सुरूवातीला इथल्या डोंगरदर्‍यांमद्धे काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. रस्त्याच्या दुतर्फा काही विशीष्ठ झाडांवरच काजव्यांचा लयबद्ध चमचमाट चालू असतो. ही काजव्यांची वाढती संख्या येणार्‍या पावसाची वर्दी देतात. त्यांच्या संखेवरून निसर्गत:च येणार्‍या पावसाच्या तीव्रतेची कल्पनाही करता येते. वातावरणातील दमटपणा आणि आद्रता जशी जशी वाढत जाते तशी तशी काजव्यांची संख्या वाढत जाते. जणूकाही सर्व नभोमंडळ जमीनीवर अवतीर्ण झाल्याचा स्वर्गीय अनुभव येतो.
गाडीचे दिवे बंद करून फक्त यारस्त्यांवर मनसोक्त भटकायचे. या अग्निशिखा कधी तुमच्या डोक्यावरुन तर कधी आजुबाजुने स्वछंदपणे बागडत असतात. भान हरपून तुम्ही रात्रभर नुस्ते निशब्द फिरत असता आणी मनमुराद ही जमीनीवरची लोभसवाणी प्रकाशफुलं वेचत असता. हा अनुभव खरच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा स्वर्गीय आनंद प्रत्तेकाने घ्यायलाच हवा. एकालयीततालासूरात निशब्द लुकलुकाट तुमच्या चोहोबाजूला चाललेला असतोआपण त्याचे मुक साक्षीदार बनलेले असतो. गाडीचे दिवे उघडझाप करून पहाहे काजव्यांचे दिवेही दिव्याच्या उघडझापीला त्यांच्या चमचमाटाने उत्तर देतात आणि तोही एका तालासुरातफक्त तुम्हाला तो ताल-सुर कानाऐवजी तुमच्या नजरेने टिपता यायला हवा.अंधार्‍या रात्री गाडीचे दिवे बंद करून अकटेच या झगमगीत रस्त्यावरून रोंयल सफर करून बघातुम्ही कुणी स्पेशल असल्याचा अनुभव नक्कीच येणार. दुतर्फा नैसर्गिक दिव्यांचा झगमगाट आणी मधून आपली सवारी चालली आहे. एखाद्या परी कथेतील वर्णन ना!.  
भंडारदर्‍याच्या परिसरात अनेक किल्ले आहेत रात्रीत काजवयांच्या संगतीत आखादा ट्रेक तर करायलाच हवा. मागच्या वर्षी असाच हरिश्चंद्रगड उतरलो होतो काजव्यानसोबतअप्रतिम अनुभव होता तो. पण हे काजवे कॅमेर्‍यात बंदिस्त करणे हे महा कर्म कठीण काम. 

काजवा हा "आरथ्रोपोडी" समुदायातला कीटक आहे. सुमारे दोन हजार जाती आहेत काजवयांच्या. प्रत्तेकाचे रंग रूप वेगळेप्रत्तेकाच्या प्रकाशात फरककुणाचा कमीतर कुणाचा जास्त. परंतु रंगात फरक जरी असला तरी हिरवट-पिवळसर प्रकाशाच्या छटाच तयार करतात हे काजवे. हा दमट वाटवरणात राहणारा जीव आहेत्याची साधारण लांबी एक ते दीड सेंटीमेटर असते. काजव्यांच्या जीवनक्रम आणि फुलपाखराचा जीवनक्रम सारखाचफक्त काजवे हे किटकभक्षी आहेत. आधी अंडीमग त्यातून अळया बाहेर येतात आणी मग उडणारा झगमगणारा कीटक तयार होतो. काजव्यांच्या शरीरात मागील पोटाखालच्या भागात पारदर्शी आवरण असतेत्याला क्युटिकल म्हणतात. यातच प्रकाश देणारा घटक असतो. काजव्यांच्या प्रकाश देणार्‍या अवयवामध्ये / पेशींमध्ये "ल्युसिफेरीन" नावाचा घटक असतो. तोच त्यांच्या चमचमटाला कारणीभूत असतो. 
काजवयांचा प्रकाश हा थंडशांत असतो. अंधार्‍यारात्री काजव्यांचे लुकलुकणे फारच मनमोहक दिसते. हे लुकलुकणे काजवयांच्या श्वासोछवासावर अवलंबून असते. जेव्हा कीटक श्वास सोडतो तेव्हा हा प्रकाश मंदावतोपुन्हा श्वास घेताना प्रकाश प्रखर होतो. नर काजवा मादीपेक्षा थोडा प्रखर प्रकाश देतोम्हणूनच मादी नराकडे आकृष्ट होते. काजवे हे किटकभक्षी आहेत म्हणून शेतकर्‍यांना त्यांचा उपयोगच होतो. पेरणीनंतर शेतात इतर कीटक अंडी घालतात त्यातून निघालेल्या अळ्या हे काजवयांचे खाद्यत्याबरोबरच शेतात उपद्रव करणार्‍या गोगलगायाही यांचे मुख्य खाद्य असतं.
हा काजवा मोहोत्सव पाहायचा असेल तर मुंबईहून घोटीमार्गे सिन्नर रस्त्यावरून भंडारदर्‍याच्या रस्त्याला लागायचेजर पुण्या वरुन यायच असेल तर आळेफाट्यावरुण संगमनेरअकोले आणी मग भंडारदर्‍याला उतरायचे. तुम्ही रात्री येणार असाल तर हे काजवेच तुमच्या स्वागताला हजर असतात. एकदा भंडारदर्‍यात आलो की मग धरणाच्या जलाशयाला वळसा घालून मुतखेलकोलटेम्भेरतनवाडीसांम्रदघाटघर पर्यंतचा रास्ता रात्रभर भटकायचा. मग घाटघर वरुन उडदावणेपांजरे करत शेंडीला मुक्कामाला यायचे.




No comments: